Delhi Hospitals Receive Bomb Threat Calls: दिल्लीतील 4 रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
Delhi police | Twitter

Delhi Hospitals Receive Bomb Threat Calls: दिल्लीतील (Delhi) किमान 4 रुग्णालयांना मंगळवारी सकाळी बॉम्बच्या धमकीचे कॉल (Bomb Threat Calls) आले. कॉलरने दीपचंद बंधू रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आणि गुरु तेग बहादूर (GTB) रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळ आणि दिल्लीतील चार ते पाच सरकारी रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर दोन दिवसांनी ही घटना घडली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, IGI विमानतळाला 12 मे रोजी एका अज्ञात खात्यातून ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. पाठवणाऱ्याने आवारात स्फोटक यंत्र असल्याची धमकी दिली होती. बुरारी सरकारी रुग्णालय आणि मंगोलपुरीच्या संजय गांधी रुग्णालयासह दोन सरकारी रुग्णालयांमध्येही असेचं ईमेल प्राप्त झाले होते. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेह वाचा -Delhi Hospitals Bomb Threat e-mails: दिल्लीतील 2 रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी, ई-मेलद्वारे पाठवण्यात आला संदेश; चौकशी सुरू)

धमकी मिळालेल्या रुग्णालयांच्या यादीमध्ये डाबरी येथील दादा देव रुग्णालय, हरी नगरमधील दीनदयाल उपाध्याय (डीडीयू) रुग्णालय, दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालय, मलका गंजचे हिंदूराव रुग्णालय आणि राजपूरचे अरुणा असफ अली शासकीय रुग्णालय यांचा समावेश आहे. दिल्ली-एनसीआरमधील 150 हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर हे बॉम्ब धमकीचे ईमेल आले आहेत ज्यामुळे पालकांमध्ये घबराट पसरली आहे.

तथापि, गृह मंत्रालयाने (MHA) अधिकृत निवेदन जारी करून ईमेलला फसवणूक म्हटले आहे. पोलिसांना 12 मे रोजी दुपारी 3 वाजता ब्ररारी हॉस्पिटलमधून धमकीची माहिती मिळाली, त्यानंतर शहरातील इतर अनेक हॉस्पिटलमधून तक्रारी आल्या. त्यानंतर पोलिस पथके रवाना करण्यात आली. परंतु, अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Rajasthan Schools Bomb Threat: जयपूरच्या एमपीएस इंटरनॅशनलसह अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, शोध मोहीम सुरु)

दरम्यान, धमकीच्या मेलनंतर कॅनॉट प्लेसमधील स्टेट एंट्री रोडवर असलेल्या सीपीआरओ इमारतीचीही तपासणी करण्यात आली. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. काही रुग्णालयांमध्ये रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. याशिवाय, IGI विमानतळावरील सुरक्षा ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरला परिसरात स्फोटक यंत्राबाबत धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. मात्र, तपासणीत कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत, असं पोलीस उपायुक्त (IGI) उषा रंगनानी यांनी सांगितले.