Delhi Hospitals Bomb Threat (PC - PTI)

Delhi Hospitals Bomb Threat e-mails: दिल्लीतील दोन रुग्णालयांना (Delhi Hospitals) ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने सांगितले की, त्यांना बुरारी आणि मंगोलपुरी येथील दोन रुग्णालयांतून बॉम्बच्या धमक्यांच्या तक्रारी मिळाल्या. अग्निशमन विभागाला बुरारी सरकारी रुग्णालय आणि दिल्लीतील मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयातून कॉल आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआरमधील 100 हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी मिळाली होती. यानंतर शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला होता. (वाचा -Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील 3 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर)

यानंतर मेलिंग ॲड्रेसची चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, याप्रकरणी पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इंटरपोलच्या मदतीने रशियाशी संपर्क साधला असून मेल पाठवणाऱ्याची माहिती गोळा केली जात आहे. ज्या मेल आयडीवरून शाळा उडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचा सर्व्हर रशियाची राजधानी मॉस्को येथे आहे. मात्र, मेल पाठवणाऱ्याचा शोध अद्याप लागलेला नाही. (वाचा -Bengaluru Schools Bomb Threats: बेंगळुरूमधील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, ईमेलद्वारे पाठवण्यात आला संदेश)

पहा व्हिडिओ -

25 मे रोजी दिल्लीत मतदान -

दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी देशाची राजधानी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी आहे. निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी समाजकंटक किंवा दहशतवादी एखादी घटना घडवून आणू शकतात. याला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा दल सज्ज आहेत.