Bengaluru School Receives Bomb Threat प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI)

Bengaluru Schools Bomb Threats: कर्नाटक (Karnataka)मधील सुमारे 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाली आहे. हा संदेश सर्व शाळांना ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. सध्या स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पालकांमध्ये घबराटीचे वातावरण असून शाळांमध्ये मोठी गर्दी झाली. स्थानिक पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात एशियन न्यूजने वृत्त प्रकाशित केलं आहे.

अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे पाठवला संदेश -

बेंगळुरूमधील 15 शाळांना लक्ष्य करून एका निनावी ईमेलद्वारे धोकादायक बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. यामुळे पालक व मुलांमध्ये घबराट पसरली आहे. एका शाळेला धमकीचा फोनही करण्यात आला आहे. मुलांना शाळेतून घेण्यासाठी पालक पोहोचले आहेत. बेंगळुरूच्या बसवश्वनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. (हेही वाचा - Bangalore School Bomb Threat: बंगळुरु येथील शाळेला बॉम्बने उडविण्याची ईमेलद्वारे धमकी, यंत्रणा सतर्क)

गेल्या वर्षीही असाच एक मेसेज आला होता, ज्यामध्ये जवळपास 30 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. सध्या या धोक्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून शाळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा - Bomb Threat: कोचीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी, तपास सुरू)

याआधीही बंगळुरूमधील शाळांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचे अनेक वेळा कॉल आले आहेत. गेल्या वर्षी 19 जुलै 2022 रोजी अशीच धमकी देण्यात आली होती. यापूर्वी 8 एप्रिल 2022 रोजी बेंगळुरूमधील 6 शाळांना धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता.