Karnataka Tahsildar Slams Government Jobs: कर्नाटक सरकारच्या एका अधिकाऱ्याने सरकारी कार्यालयांच्या कारभाराविरोधात (Government Job) संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या प्रचंड दबावाबाबत एक वक्तव्य केले. त्या वक्तव्याने आता वाद निर्माण झाला आहे. केके कृष्णमूर्ती (KK Krishnamurthy) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तालुका राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संताप व्यक्त करताना "पाणीपुरी विक्रेता किंवा मंचूरियन विक्रेता असणे चांगले", असे थेट वक्तव्य (Karnataka Tahsildar Slams Government Job) त्यांनी कृष्णमूर्ती यांनी केले.
कृष्णमूर्ती त्यांच्या वक्तव्यावर पुढे म्हणाले की, विक्रेते कामाच्या दबावापासून मुक्त असल्याने आनंदी जीवन जगतात. “ते वाटेल तेव्हा सुट्टीवर जाऊ शकतात, शांतपणे घरी परत येऊ शकतात आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतात. त्या उलट, सरकारी अधिका-यांना सतत तणावाचा सामना करावा लागतो. ते साध फिरायचं म्हटले तरी त्यांच्या कुटुंबियांना मंदिरात घेऊन जाऊ शकत नाहीत,” असे म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला. (CIDCO Recruitment: सिडकोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 29 रिक्त पदांसाठी नोकर भरती, 11 जानेवारी 2025 अर्जाची शेवटची तारीख)
कामाचा तणाव कसा वाढतो याबाबत त्यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले, “तंत्रज्ञानाने आपला वर्कलोड कमी होण्याऐवजी वाढवला आहे. वरिष्ठ अधिकारी व्हॉट्सॲप ग्रुप्सद्वारे आपल्या कामाचे निरीक्षण करतात. त्याच दिवशी कामाच्या एकूण निकालांची मागणी करतात. त्यात कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास. त्याचा परिणाम मोठा होतो. विभागीय चौकशी बोलावली जाते. अनेकदा चुकीच्या कारणांमुळे वेगवेगळ्या चौकशी मागे लागतात,” असे ते पुढे म्हणाले.
कृष्णमूर्ती यांनी कामाच्या ठिकाणी विशिष्ट भूमिकासमोर येणाऱ्या आव्हानांची नोंद केली. "ग्रामीण लेखापाल सूडाच्या भीतीमुळे त्यांच्या संघर्षात आवाज उठवू शकत नाहीत आणि शिक्षक, शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, त्यांच्यावर मुलांना अंडी आणि स्नॅक्स वाटणे यासारख्या सरकारी योजनांचा बोजा दिला जातो," असे ते म्हणाले.(MSRTC Job Recruitment: एसटी महामंडळात 208 जागांसाठी नोकर भरती, 13 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख; अर्ज कुठे अन् कसा कराल?)
कामाच्या ठिकाणी वातावर चांगले नसल्याने अनेकांना रक्तदाब, मधुमेह, किडनी व यकृतांचे आजार जडले आहेत. अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर मोठा बदल होत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. या असह्य दबावामुळे स्वेच्छानिवृत्तीचा विचार केल्याचे केके कृष्णमूर्ती यांनी कबूल केले.