Mysore Shocker: कर्नाटकातील म्हैसूर तुरुंगातील (Mysore Jail) तीन कैद्यांचा केक बनवण्यासाठी वापरले जाणारे एसेन्स प्यायल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी रात्री सताघल्ली येथील तुरुंगात एसेन्स ()प्यायल्यानंतर मृत्यूची ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसरा, तिघांनीही 28 डिसेंबर रोजी एसेन्स प्यायले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांची प्रकृती बिघडत चालली हे पाहून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Tirupati Stampede Update: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देणार घटनास्थळास भेट)
नवीन वर्षाच्या निमित्ताने केक बनवण्यासाठी हे एसेन्स आणण्यात आले होते. बेकरी विभागात काम करणाऱ्या या तिघांनी कदाचित ते नशा समजून प्यायले असेल. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Google Map Mislead: गुगल मॅपच्या भरवशावर बसले अन् पोलिसही अडकले; नागालँडमध्ये स्थानिकांनी रात्रभर पोलिसांना ठेवले ओलीस)
असे सांगितले जात आहे की, एसेन्स प्यायल्यानंतर तिघांनाही पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना तुरुंगाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेव्हा त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, तेव्हा तिघांनाही केआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. ... दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.