Photo credits: X/@sudhirjourno

Tirupati Stampede Update: आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी एक जण तामिळनाडूतील सालेम येथील रहिवासी आहे. वैकुंठ द्वार दर्शन टोकन घेण्यासाठी तिरुपतीतील विविध तिकीट केंद्रांवर सकाळपासूनच हजारो भाविकांनी रांगा लावल्या होत्या. बैरागी पट्टीडा उद्यानात भाविकांना रांगेत उभे राहण्याची परवानगी असताना ही घटना घडली.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

अपघातानंतर तिरुपती पोलिसांनी तात्काळ परिस्थिती वर नियंत्रण मिळवत भाविकांना सुखरूप बाहेर काढले. वास्तविक, वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आल्याने हजारो लोक टोकनसाठी गर्दी करत आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी आपत्कालीन बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रसारमाध्यमांना परिस्थितीची माहिती देण्याचे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तिरुपतीला जाणार

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आज तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेणार आहेत.