
राज्याचे राज्य अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेच्या कारणावरुन त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. हा राजीनामा दिला की घेतला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची पहिली विकेट पडली आहे. केवळ धनंजय मुंडेच नव्हे तर वेगळ्या प्रकरणात आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार लटकती आहे. त्यामुळे विद्यमान राज्य सरकारमधील एका मंत्र्याची विकेट पडली आहे. दुसरी प्रतिक्षेत आहे, अशीचर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.
माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण नेमके काय?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषीमंत्री आहेत. स्वत: कोकाटे आणि इतर काही मंडळींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका बळकावल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला आहे. या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. असे असले तरी, सत्र न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरुन विरोधकांनी कोकाटे यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे राज्य सरकारवर या राजीनाम्याचाही दबाव आहे. त्यामुळे कोकाटे यांची विकेट पडणार का? अशी चर्चा आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना धक्का, मंत्रिमंडळातील पहिली विकेट; अजित पवारांना 'उशीरा सूचलेले शहानपण')
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरण
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक जोरदार आक्रमक स्थिती पाहायला मिळाले. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेस कोर्टाने आंतिरिम स्थिगिती दिली आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरम्याच्या निर्णयावर न्यायालयाने अद्यापही स्थगिती दिली नाही. त्यामुळे
कोर्टाचा अंतिम निर्णय येईल तेव्हा त्याबाबत विचार केला जाईल. सध्यास्थितीत त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत फडणवीस यांनी कोकाटे यांची पाठराखण केली आहे. (हेही वाचा, Fraud-Forgery Case: महाराष्ट्राचे कृषी मंत्री Manikrao Kokate यांना दिलासा; 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणातील 2 वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने दिली स्थगिती)
दरम्यान, धनंजय मुंडे काय किंवा माणिकराव कोकाटे काय, हे दोन्ही मंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यात मुंडे यांचा तर राजीनामा झालाच आहे. आता कोकाटे यांनाही राजीनामा द्यायची वेळ आली तर महायुती सरकारमध्ये पहिल्या दणक्यातच दोन विकेट पडल्या जातील. पण, या दोन्ही विकेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असतील त्यामुळे सहाजिकच अजित पवार यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.