प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File)

बेंगळुरूमधील (Bangalore) एका शाळेला सोमवारी बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb threat) मिळाली. नॅशनल हिल व्ह्यू पब्लिक स्कूलच्या (National Hill View Public School) ईमेल आयडीवर ही धमकी पाठवण्यात आली होती, जी दक्षिण बेंगळुरूमधील राजराजेश्वरीनगरमध्ये (Rajarajeshwari Nagar) आहे. शाळेच्या अधिकृत आयडीवर ईमेल पाठवण्यात आला होता, ज्यात दावा करण्यात आला होता की खाजगी शाळेच्या आवारात स्फोटक यंत्र ठेवण्यात आले होते. KPCC अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या मालकीच्या नॅशनल हिल व्ह्यू पब्लिक स्कूलला बॉम्बचा धमकीचा संदेश मिळाला. धमकीचा ईमेल समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मुलांना सकाळी घरी पाठवले.

धमकीच्या मेलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि पोलिसांनी येऊन जागेची तपासणी केली.