सोमवारी कोची-बेंगळुरू मार्गावर इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. धमकीचा कॉल आल्यानंतर लगेचच विमानातील प्रवाशांना कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. माहिती देताना विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले की, विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. रिपोर्टनुसार, फ्लाइट 6E6482 सकाळी 10:30 वाजता बेंगळुरूसाठी रवाना होणार होते तेव्हा विमानात बॉम्बची धमकी मिळाली. नेदुम्बसेरी पोलिसांनी बॉम्बची धमकी मिळाल्याची पुष्टी केली आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक पथक तयार करण्यात आल्याचे सांगितले. पथकाच्या प्राथमिक तपासानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)