Rajarshi Shahu Maharaj Punyatithi HD Images 2024 in Marathi: सामाजिक सुधारणेबरोबरच साहित्य, कला, कुस्ती, शेती, जलप्रकल्प उभारणी, व्यवसाय उभारणी, शिक्षण अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024). शाहू महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. यशवंत यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथे झाला. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर 17 मार्च 1884 रोजी दत्तक गेले.
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर ते 28 वर्षे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. पुढे मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले.
शाहू महाराजांनी अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी संघर्ष केला. त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. मागासलेल्या वर्गांतील मुला-मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.
यासोबतच त्यांनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
अशाप्रकारे सामान्यांसाठी झटणाऱ्या या लोकराजाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त Images, Whatsapp Status, Messages द्वारे करा अभिवादन!
(हेही वाचा: Parshuram Jayanti 2024 Date: भगवान परशुराम जयंतीची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या)
दरम्यान, महाराजांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश कोल्हापूर संस्थानात काढला. यासोबतच शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली.