आषाढी एकादशी निमित्त आज पीएम नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत X  पोस्ट करत विठू माऊलीच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.मुंबई मध्ये वडाळा येथील प्रतिपंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सपत्नीक पूजा केली आहे. एकनाथ शिंदेंनीही महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज आषाढीच्या मंगलपर्वावर पंढरपूरात लाखो भाविक विठ्ठल- रूक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज ज्यांना पंढरपूरात दर्शनाला जाणं शक्य नाही ते जवळपास असणार्‍या विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात.

पीएम मोदींच्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

एकनाथ शिंदे

राज ठाकरे

सुप्रिया सुळे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)