OnePlus 7T Pro स्मार्टफोन भारतात झाला स्वस्त, 'या' किंमतीत युजर्सला खरेदी करता येणार
One Plus 7T Pro (Photo Credits-Twitter)

भारतात OnePlus 7TPro स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा घट करण्यात आली आहे. त्यामुळे युजर्सला आता 4 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन 2019 मध्ये भारतात लॉन्च केला होता आणि याच्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याची खुपच चर्चा होती. या स्मार्टफोनला Snapdragon 855+ प्रोसेसरवर उतरवला होता. तसेच स्मार्टफोनची किंमत 53,999 रुपयांत लॉन्च केला होता. लॉन्च करण्यात आल्यानंतर याची किंमत पुन्हा कमी करण्यात आली आहे.(Redmi 9A चा नवा वेरियंट लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक)

वनप्लस टी7 प्रो स्मार्टफोनची किंमत 4 हजार रुपयांनी कमी केली असून तो आता 42,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर आतापर्यंत हा स्मार्टफोन 47,999 रुपयांना उपलब्ध करुन दिला होता. या स्मार्टफोनमध्ये 8GB आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिला आहे. नव्या किंमती बद्दल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अपटेड करण्यात आले आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट दिला असून अॅन्ड्रॉइड10 OS वर आधारित आहे. यामध्ये 6.67 इंचाचा क्युएचडी+Fluid एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले सुद्धा आहे. स्मार्टफोन Snapdragon 855 Plus चिपसेट वर आधारित आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये Warp Charge 30T फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4085mAh ची बॅटरी दिली आहे.(Flipkart Big Saving Days ला येत्या 18 सप्टेंबर पासून होणार सुरुवात, नागरिकांना फक्त 1 रुपयांत प्री-बुक करता येणार सामान)

फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 48MP चा Sony IMX586 प्रायमरी सेंसर मिळणार आहे. तसेच 16MP वाइड अँगल लेंस आणि 8MP टेलिफोटो लेंस दिला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP चा पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, जीपीएस आणि टाइप सी सारखे फिचर्स दिले आहेत.