
एअर इंडिया कडून Simulator Trainer ला त्याची कामं योग्य प्रकारे न केल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, प्रशिक्षक पायलट अंतर्गत वारंवार प्रशिक्षण घेतलेल्या दहा वैमानिकांना पुढील चौकशी होईपर्यंत उड्डाण करण्याच्या कामावरून हटवण्यात आले आहे, असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. एअरलाइनच्या माहितीनुसार, "टाटा समूहाच्या अंतर्गत एअर इंडियाचे खाजगीकरण झाल्यानंतर लगेचच, एअरलाइनने स्पष्ट वर्तणुकीय अपेक्षा स्थापित करण्यासाठी आणि टाटा समूह कंपनीच्या सांस्कृतिक बदलाला गती देण्यासाठी Tata Code of Conduct लागू केली."
सर्व कर्मचाऱ्यांना टाटाच्या नीतिमत्ता आणि नीतिमत्तेशी संबंधित धोरणे, जसे की लाचलुचपत प्रतिबंधक, भ्रष्टाचार प्रतिबंधक आणि माहिती उघड करणे, यांसारख्या सर्वांगीण प्रशिक्षणाचा समावेश होता. त्यात म्हटले आहे की वरिष्ठ व्यवस्थापनाच्या नेतृत्वाखालील एक समिती unethical behaviour वर लक्ष ठेवण्यासाठी बनवण्यात आली आहे. चौकशी करण्यासाठी आणि कठोर परिणामांची अंमलबजावणी करण्यासाठी एक प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली.
स्वतंत्र असलेल्या अनुभवी टीमद्वारे हे रेकॉर्ड केले जाते आणि तपासले जाते. या प्रक्रियेअंतर्गत, केवळ 2024 मध्ये एअर इंडियाच्या 30 हून अधिक कर्मचाऱ्यांना विविध नैतिक उल्लंघनांसाठी काढून टाकण्यात आले आहे. तर अनेकांवर इतर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच, एका व्हिसलब्लोअरने आरोप केला आहे की वैमानिकांसाठी वारंवार होणाऱ्या सिम्युलेटर प्रशिक्षणादरम्यान सिम्युलेटर ट्रेनर पायलटने त्याचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडले नाही.
सविस्तर चौकशी करण्यात आली असून पुरावे पाहता आरोपाला पुष्टी मिळाली आहे. त्यानुसार, संबंधित प्रशिक्षक पायलटच्या सेवा रद्द करण्यात येत आहेत. खबरदारी म्हणून, प्रशिक्षक पायलटच्या अंतर्गत वारंवार प्रशिक्षण घेतलेल्या दहा पायलट्सना पुढील चौकशी होईपर्यंत उड्डाण करण्याच्या कामापासून दूर ठेवले जाणार आहे. एअर इंडियाने स्वतःहूनच हे प्रकरण डीजीसीएला कळवले आहे. दरम्यान त्यांनी व्हिसलब्लोअरचे केलेल्या कृत्याचं कौतुक केले आहे.