Bolivia Bus Accident (फोटो सौजन्य - X/@nabilajamal_)

Bolivia Bus Accident: बोलिव्हिया (Bolivia0 च्या पोटोसी प्रदेशात झालेल्या बस अपघातात (Bus Accident) किमान 37 जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले. शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजता उयुनी आणि कोलचानी दरम्यानच्या रस्त्यावर हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एक बस विरुद्ध लेनमध्ये वळली, ज्यामुळे ही टक्कर झाली. अल जझीराच्या वृत्तानुसार, उयुनी हे सालार दे उयुनीचे प्रवेशद्वार आहे, जे एक प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. हे 10 हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले जगातील सर्वात मोठे मीठाचे मैदान आहे.

पोटोसीच्या विभागीय पोलिस कमांडच्या प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्राणघातक अपघातामुळे, उयुनी शहरातील चार रुग्णालयांमध्ये अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातात 37 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रवक्त्याने सांगितले की, पोलिस कर्मचारी मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. (हेही वाचा -Bangladesh Air Force Base Attacked: बांगलादेश मधील कॉक्स बाजार येथे हवाई दलाच्या तळावर हल्ला; 1 जण ठार, अनेक जखमी (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

अपघातातील एक बस ओरुरोला जात होती, जिथे एक मोठा कार्निव्हल उत्सव सुरू होता. अपघातातून वाचलेल्या चालकांपैकी एकाने अपघातापूर्वी मद्यपान केले असावे, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. प्रवाशांनी त्याला दारू पिताना पाहिले असल्याचे वृत्त आहे. बोलिव्हियाचे डोंगराळ रस्ते जगातील सर्वात घातक आहेत. येथे दरवर्षी सरासरी 14 हजार लोकांचा मृत्यू होतो.