Photo Credit-X

Hyderabad Fire: हैदराबादमधील कोंडापूर येथील महिंद्रा कार शोरूममध्ये गुरुवारी रात्री 9.30 वाजता भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. ज्यामुळे मोठे नुकसान झाले. शोरूम बंद (car showroom fire)होत असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांना धूर दिसला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल विभागाने तात्काळ कारवाई करत आठ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अडीच तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले.

आगीचा व्हिडीओ

नुकसान आणि सुरक्षा उपाय

या आगीत शोरूमच्या दोन मजल्यांवरील 14 गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग पसरण्याचा धोका बाजूला असणाऱ्या ओयो हॉटेलला होता. परिस्थीती टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शोरूमजवळील असणाऱ्या सहर्ष ग्रँड ओयो हॉटेलमधील नागरिकांना बाहेर काढले. या घटनेमुळे कोंडापूर आणि कोठागुडा भागांना जोडणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

आगीच्या कारणांचा तपास

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरे कारण शोधण्यासाठी आणि मालमत्तेच्या नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी चौकशी सुरू आहे.