
Netherlands National Cricket Team VS Canada National Cricket Team Match Scorecard: नेदरलँड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ हे आज आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ मध्ये एकमेकांसमोर आले आहेत. हा एकदिवसीय सामना नामिबियातील विंडहोक येथील वँडरर्स स्पोर्ट्स ग्राउंडवर खेळला जात आहे. ज्यामध्ये नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कॅनडाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
नेदरलँड्स विरुद्ध कॅनडा खेळाडू
नेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघ: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, झॅक लिऑन कॅचेट, कॉलिन अॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, तेजा निदामानुरू, टिम व्हॅन डर गुग्टेन, काइल क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.
कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ: नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन (कर्णधार), युवराज समरा, परगत सिंग, हर्ष ठाकर, श्रेयस मोवा (यष्टीरक्षक), साद बिन जफर, डिलन हेलिगर, परवीन कुमार, शाहिद अहमदझाई, कलीम सना.
सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्ट कुठे आणि कसे पहाल?
भारतात या सामन्याचे अधिकृत प्रसारण उपलब्ध नाही. मात्र, चाहते फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.