
Where To Watch Namibia National Cricket Team vs Canada National Cricket Team Live Telecast: नामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना 22 मार्च (शनिवार) रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 05.30 वाजता विंडहोक येथील नामिबिया क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. शेवटचा टी20 सामना पावसामुळे रद्द झाला होता. परंतु नामिबिया सध्या 1-0 ने आघाडीवर आहे आणि अजून दोन सामने खेळायचे आहेत.
दरम्यान, कॅनडाकडून युवराज समराने सर्वाधिक 37 धावा केल्याय तर अखिल कुमारने 3 विकेट घेत संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या सामन्यात नामिबियाने 3 गडी राखून रोमांचक विजय मिळवला. पावसामुळे सामना प्रति डाव 15 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने युवराज समरा (37) आणि कंवरपाल तत्गुआर (30) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे 8 बाद 145 धावा केल्या.
नामिबिया विरुद्ध कॅनडा चौथा टी20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
नामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना 22 मार्च (शनिवार) रोजी विंडहोक येथील वँडरर्स क्रिकेट ग्राउंडवर संध्याकाळी 5.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल.
नामिबिया विरुद्ध कॅनडा चौथ्या टी20 2025 सामन्याचे प्रक्षेपण कुठे पहायचे?
नामिबिया विरुद्ध कॅनडा चौथ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्याही टीव्ही चॅनेलवर उपलब्ध होणार नाही. भारतीय चाहते विविध प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
नामिबिया विरुद्ध कॅनडा चौथा टी 20 सामना स्ट्रीमिंग कसा पहाल?
भारतीय चाहते फॅनकोडवर नामिबिया विरुद्ध कॅनडा चौथ्या टी20 सामना लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकतात. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोडवर उपलब्ध असेल. जिथे चाहते मोबाईल, स्मार्ट टीव्ही, टॅबवर हा सामना पाहू शकतात.