NZ Team (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा उपांत्य सामना 5 मार्च (बुधवार) रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि केन विल्यमसनने शतकीय खेळी केली. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Milestone: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा)

रचिन-विल्यमसनची शतकीय खेळी

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 101 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 13 चौकार आणि एक षटकार लागला. तर केन विल्यमसनने 94 चेंडूत 102 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटी, डॅरिल मिशेलने 37 चेंडूत 49 धावा केल्या आणि ग्लेन फिलिप्स 27 चेंडूत 49 धावा करून नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

पहिल्या डावातील धावफलक:

न्यूझीलंड फलंदाजी: 362/6, 50 षटकांत (विल यंग 21, रचिन रवींद्र 108, केन विल्यमसन 102, डॅरिल मिशेल 49, टॉम लॅथम 4, ग्लेन फिलिप्स नाबाद 49, मायकेल ब्रेसवेल 16, मिशेल सँटनर नाबाद 2)

दक्षिण आफ्रिका गोलंदाजी: (लुंगी एनगिडी 3 बळी, कागिसो रबाडा 2 बळी आणि विआन मुल्डर 1 बळी).