Rohit Sharma (Photo Credit -X)

India National Cricket Team vs Australia National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून इतिहास रचला. (हे देखील वाचा: Rohit Sharma Records: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात रोहित शर्माने रचला इतिहास; केले अनेक विक्रम)

अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

यापूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक, आयसीसी टी-20 विश्वचषकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने रोहित शर्माने नवा इतिहास रचला आहे. रोहित शर्मा हा चारही पुरुष आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा जगातील पहिला कर्णधार बनला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सर्व आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत केला प्रवेश

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (2023)

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (2023)

आयसीसी टी-20 विश्वचषक (2024)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2025)

अंतिम फेरीत टीम इंडियाचा कोणाशी होणार सामन?

टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आता आज दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यातील विजेता संघ ९ मार्च रोजी टीम इंडियाविरुद्ध स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना खेळेल.