Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

Janegaon Suicide Case:  बीड मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सारा महाराष्ट्र हळहळला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुखच्या मारहाणीचे फोटो वायरल झाले आहेत. संतोष देशमुखला झालेल्या अमानुष छळाच्या फोटोने सारे सुन्न झाले आहेत. दरम्यान जानेगाव (Janegaon)  मधील एका 23 वर्षीय तरूणाने देखील हे फोटो पाहून गळफास घेत जीवन संपवलं आहे. ही बीडच्या केज तालुक्यातील जानेगाव मधील घटना आहे.

मृत 23 वर्षीय तरूणाचे नाव अशोक हरिभाऊ शिंदे आहे. अशोक संतोष देशमुखला झालेल्या मारहाणीने व्यथित झाले होते. अशोक यांनी संतोषचे फोटो पाहून मित्रांसोबत चर्चा केली. घरी गेल्यानंतर त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष देशमुख यांच्या आठवणीत काल (4 मार्च) जानेगाव बंद ठेवण्यात आले होते. अशोक शिंदेने सारं गाव बंद करण्यासाठी आग्रह केला होता. Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख मर्डर केसमध्ये Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती .

दरम्यान अमानुष मारहाणीचे फोटो पाहून अनेकजण व्यथित झाले आहेत. संतोषच्या भावाने सध्या अशा पद्धतीने कोणीही आत्महत्या टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे.

संतोष देशमुख हत्येने महाराष्ट्रात सध्या संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी ठरवण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आल्याने कालच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले आहे.

मानसोपचार तज्ञांची एकदा मदत घ्या

Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.Mumbai nightlife