बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यांनी अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पावरील खंडणीच्या प्रयत्नांना विरोध केला होता, ज्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा हत्येमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. गेल्या काही आठवड्यांपासून विरोधक याबाबत सरकारवर टीका करत आहेत. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

दुसरीकडे, या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, आणि त्यांनी तपासाबद्दल असमाधान व्यक्त करून उपोषण सुरू केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येने स्थानिक राजकारण, जातीय संघर्ष, आणि पोलिसांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. (हेही वाचा: Maharashtra-Karnataka Bus Services Row: पोलीस बंदोबस्तात सुरु होऊ शकते महाराष्ट्र व कर्नाटकमधील बस सेवा; गाड्यांमध्ये सुरक्षा मार्शल तैनात करण्याचा परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा विचार)

Beed Sarpanch Murder Case:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)