
India National Cricket Team vs Australia National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यात दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दरम्यान, आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माचे स्थान वाढत आहे. फक्त चार वर्षांत, रोहित शर्माने भारतीय संघाला 26 वेळा विजय मिळवून दिला आहे. 2021 मध्ये रोहित शर्माने विराट कोहलीकडून कमान स्वीकारली. तेव्हापासून, रोहित शर्माने चार आयसीसी स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
रोहित शर्मा यशस्वी कर्णधार
2024 मध्ये टीम इंडियाला दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात रोहित शर्मा यशस्वी झाला. रोहित शर्मा घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ होता, पण ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात तोंडातला घास काढून घेतला. रोहित शर्माने गेल्या 23 आयसीसी सामन्यांपैकी 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फक्त एकच सामना गमावला आहे. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Milestone: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची कामगिरी
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत. या काळात रोहित शर्माने 14 डावांमध्ये 49.27 च्या सरासरीने 585 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद 123 धावा आहे.
रोहित शर्माची एकदिवसीय कारकीर्द
टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत २७२ सामने खेळले आहेत. या काळात रोहित शर्माने 264 डावांमध्ये 48.88 च्या सरासरीने 11,092 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 32 शतके आणि 57 अर्धशतके झळकावली आहेत. रोहित शर्माचा सर्वोत्तम स्कोअर 264 धावा आहे.