BMW Loses Control On Coastal Road (फोटो सौजन्य - You Tube)

BMW Loses Control On Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वर एका व्यक्तीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चालकाचा बीएमडब्ल्यू कार (BMW Car Accident) वरील ताबा सुटून ती बाजूच्या रेलिंगवर आदळताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रफ्तार7811 या इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

यामध्ये बीएमडब्ल्यू कार एका पांढऱ्या वॅगन आरला वेगाने ओव्हरटेक करताना दिसते. त्यानंतर ती समोरील टोयोटा फॉर्च्युनर या दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते, मात्र, यादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो आणि कार दुभाजकावर जाऊन आदळते. (हेही वाचा - Hyderabad Stunt Video: हैदराबाद आउटर रिंग रोडवर तरूणांची स्टंटबाजी; फॉर्च्युनर आणि बीएमडब्ल्यू गोल-गोल फिरवत धींगाणा (Watch Video))

कोस्टल रोडवर बीएमडब्ल्यूचा अपघात, पहा व्हिडिओ - 

बीएमडब्ल्यू चालकाने ब्रेक दाबले, परंतु त्याच्या वेगामुळे कार नियंत्रण गमावते आणि डावीकडे वळते, ज्यामुळे फॉर्च्युनर अपघातातून थोडक्यात वाचते. कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेली घटना एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखी वाटत आहे. मुंबईच्या कोस्टल रोडवर पहिला भीषण अपघात हाजी अलीजवळ घडला होता. या अपघातात एका कारने नियंत्रण गमावले आणि ती दोनदा उलटली.