स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) नुकताच Redmi 9 सीरिज मधील बजेट स्मार्टफोन Redmi 9A हा दोन स्टोरेज ऑप्शनसह ग्लोबली उतरवला आहे. आता कंपनीने या स्मार्टफोनचा 4GB रॅम+ 64GB स्टोरेज वेरियंट चीन मध्ये लॉन्च केला आहे. तर जाणून घ्या Redmi 9A च्या नव्या वेरियंटसह किंमतीबद्दल अधिक. तर रेडमीच्या नव्या 9A च्या 4जीबी+128जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 799 चीनी युआन (8600 रुपये) आहे. हा स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन रंगाच्या ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लॉन्च करण्यात येणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
रेडमी 9A स्मार्टफोन 2जीबी रॅम+ 32जीबी स्टोरेज आणि 3जीबी+32जीबी स्टोरेज वेरियंटसह भारतीय बाजारात उपलब्ध आहे. याच्या पहिल्या वेरियंटची किंमत 6799 रुपये आणि दुसऱ्या वेरियंटची किंमत 7499 रुपये आहे. तसेच या स्मार्टफोनसाठी 6.53 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. याचे रेज्योल्यून 720x1600 पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये उत्तम परफॉर्मेंसेससाठी MediaTek Helio G25 चिपसेटसह 32GB इंटरनल स्टोरेद दिला आहे. हा स्टोरेज युजर्सला मायक्रो एसडी कार्डचा वापक करुन 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.(Mi 10 सीरिज मधील दोन स्मार्टफोन घेऊन येणार शाओमी, 108MP कॅमेऱ्यासह 5000mAh ची मिळणार बॅटरी)
तसेच युजर्सला स्मार्टफोनच्या रियरमध्ये 13MP चा कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित MIUI 12 वर काम करणार आहे. कंपनीने Redmi 9A स्मार्टफोनमध्ये 4G LTE, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि मायक्रो युएसबी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत. तसेच स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून जी 10W फास्ट चार्जिंग फिचर सपोर्ट करणार आहे. या स्मार्टफोनचे वजन 194 ग्रॅम आहे.