Xiaomi कंपनी त्यांच्या Mi10 सीरिज अंतर्गत सातत्याने नवे स्मार्टफोन बाजारात उतरवत आहेत. तर ग्लोबल मार्केटमध्ये शाओमीने फोनचे लाईट वर्जन Mi 10 Lite जाहीर केला आहे. या डिवाइसेस नंतर शाओमीने चीनमध्ये Mi 10 Youth आणि Mi 10 Ultra ने एन्ट्री केली आहे. तर आता कंपनी या पॉप्युलर सीरिज अंतर्गत Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी अजून वेळ आहे. परंतु या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी Mi10T आणि Mi10T Pro अॅमेझॉनवर दिसला होता. या लिस्टिंगमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती नव्हती. परंतु फोनच्या डिझाइन संबंधित काही गोष्टी उघड झाल्या होत्या. तर MuyComputer ने या दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन लिस्ट लीक केल्या होत्या.
असे सांगितले जात आहे की, फोनच्या स्टँडर्ड वेरियंटमध्ये 6GB रॅम आणि प्रो वेरियंटमध्ये 8GB रॅम दिला जाणार आहे. लीक रिपोर्टनुसार, दोन्ही स्मार्टफोन 865 SoC प्रोसेसरसह येणार आहे. तसेच दोन्ही डिवाइसमध्ये 128जीबी आणि 256जीबीचा स्टोरेज ऑप्शन दिला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, फोनमध्ये 2340X1080 पिक्सल रेज्यॉल्यूशनसह फुल एचडी+ रेज्यॉल्यूशन दिला आहे. डिस्प्लेची खासियत म्हणजे 144Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे.(Poco M2 launch In India: पोको एम2 स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, फिचर्स)
शाओमी कंपनीच्या Mi 10T बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 108 ऐवजी 64 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. ओएससाठी फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 आउट-ऑफ-द बॉक्सवर बेस्ड MIUI 12 दिला आहे. तसेच फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. पण हा स्मार्टफोन कंपनीकडून कधी लॉन्च करण्यात येणार याबद्दल अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.