स्मार्टफोन उत्पादक चीनी कंपनी पोकोने मंगळवारी आपला बहुचर्चित एम 2 स्मार्टफोन भारतात लॉन्च (Poco M2 Smartphones launch In India ) केला. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो जी80 ऑक्टा कोर प्रोसेसर, कोर प्रोसेसर आणि 6जीबी रॅम युक्त आहे. या स्मार्टफेनची सुरुवातीची किंमत ( Poco M2 Smartphones Price ) 10,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ही किंमत 64जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलसाठी आहे. इतर मॉडेल 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज इतका आहे. ज्याची किंमत 12,499 रुपये आहे.
प्राप्त माहितीनुसार पोको एम2 स्मार्टफोन भारतात 15 सप्टेंबरपासून विक्रिसाठी उपलब्ध असतील. कंपनीने म्हटले आहे की, पोको एम2 स्मार्टफोनची दोन्ही मॉडेल काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असतील. (हेही वाचा, Poco M2 Launched in India (Photo Credits: Poco India Twitter))
Conveniently priced, you can own the #POCOM2’s 6GB+64GB at ₹10,999 and the 6GB+128GB at ₹12,499 so that #PowerFTW is easy on your pocket. pic.twitter.com/0mHH2wisE9
— POCO India #POCOM2 (@IndiaPOCO) September 8, 2020
पोको एम2 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंच फूल एचडी डिस्ल्पे आहे. याचे रिज्योलूशन 2340*1080 इतके आहे. याचा आस्पेक्ट रेशो 19.5:9 इतका आहे. हा स्मार्टफोन 5000 एमएच बिल्टइन बॅटरीने युक्त आहे. सोबतच या फोनला 18 वॉट फास्ट चार्जिंग ऑप्शनही आहे.