VingaJoy ने लाँच केला 'Pocket Mein Rocket' ब्लूटुथ स्पीकर, जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये
VingaJoy Pocket Mein Rocket Bluetooth Speaker (Photo Credits: Twitter)

VingaJoy कंपनीने भारतात एकाहून एक जबरदस्त गॅजेट्स भारतात आणले आहे. त्यांचे गॅजेट्स हे सध्याच्या टेक्नोसॅवी तरुण पिढीला आवडतील अशा पद्धतीचे बनवलेले असतात. नुकताच त्यांनी पार्टी, पिकनिकसाठी वापरता येईल असा जबरदस्त ब्लूटुथ स्पीकर लाँच केला आहे. या ब्लुटूथ स्पीकरला 'Pocket mein Rocket' नाव देण्यात आले आहे. नावावरुन हा ब्लुटूथ स्पीकर जरा हटकेच वाटत आहे. पॉकेट में रॉकेट SP-650 ब्लूटुथ स्पीकर हा दिसायला खूप लहान असला तरी आवाजाच्या बाबतीत अगदी अव्वल आहे. यात 5W चे मेटल वायरलेस स्पीकर लावण्यात आले आहेत.

या स्पीकरची किंमत 1599 रुपये इतकी आहे. हा वजनाने हलका स्पीकर असला तरीही साउंड क्वालिटीच्या बाबतीत अगदी अव्वल आहे. याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात देण्यात आलेल्या ब्लूटुथ 5.0 वापरण्यात आले आहे ज्यामुळे 11 मीटर दूर असलेल्या डिवाईसशी हा कनेक्ट केला जाऊ शकतो. यात चार्जिंगसाठी 400mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, यात 8 तासांचा म्यूजिक प्लेबॅक मिळतो. Redmi Smart Band भारतामध्ये झालं लॉन्च; किंमत 1,599 रूपये, इथे जाणून घ्या खास फीचर्स

त्याचबरोबर iphones, Android आणि लॅपटॉपवरही हा कनेक्ट केला जाऊ शकतो. हा दिसायला फार लहान असल्यामुळे पार्टी, पिकनिकसाठी जाताना तुम्ही हा सहजरित्या हाताळू शकता. लवकरच हा रिटेल स्टोर्समध्येही विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.

दरम्यान आज भारतात लाँच झालेल्या गॅजेट्सविषयी बोलायचे झाले तर, आज भारतामध्ये Redmi Smart Band लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत Rs 1,599 आहे. भारतामध्ये 9 सप्टेंबर पासून तो उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाईन हा बॅन्ड mi.com, Mi Home stores, Amazon India यावर उपलब्ध असेल तसेच ऑफलाईन रिटेल शॉप्समध्येही उपलब्ध असणार आहे.