Redmi | Photo Credits: Twitter/ RedmiIndia

Xiaomi या लोकप्रिय चायनीज कंपनीने आता मोबाईल पाठोपाठ स्मार्ट बॅन्डची देखील रेंज लॉन्च करण्यात सुरूवात केली आहे. यामध्ये आज (8 सप्टेंबर) रेडमी कडून भारतामध्ये Redmi Smart Band लॉन्च करण्यात आला आहे. दरम्यान त्याची किंमत Rs 1,599 आहे. भारतामध्ये 9 सप्टेंबर पासून तो उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाईन हा बॅन्ड mi.com, Mi Home stores, Amazon India यावर उपलब्ध असेल तसेच ऑफलाईन रिटेल शॉप्समध्येही उपलब्ध असणार आहे. मग आता या स्मार्ट बॅन्ड विकत घेण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल तर जाणून घ्या त्यामध्ये नेमकी फीचर्स काय? रंग कोणते उपलब्ध आहेत? आणि बरंच काही.

Redmi Smart Band ची फीचर्स

  • रेडमी स्मार्ट बॅन्ड हा 1.08 इंच आयताकृती आणि TFT color display सोबत Touch Button सह आहे.
  • रेडमी स्मार्ट बॅन्ड 5 विविध स्पोर्ट अ‍ॅक्टिव्हिटींना मदत करणारा आहे. यामध्ये सायकलिंग, आऊट डोअर रनिंग, एक्सरसाईज, ट्रेडमिल आणि फास्ट वॉकिंग चा पर्याय आहे.
  • स्मार्ट वॉचामध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर आहे. याच्या द्वारा 24/7 हृद्याच्या क्रियेवर लक्ष ठेवले जाऊ शकते. हा बॅन्ड हार्ट रेट अलर्ट देखील पाठवू शकणार आहे.
  • रेडमीचा हा फीटनेस बॅन्ड युजर्सना स्लीप पॅटर्न ट्रॅक करण्यासाठीदेखील फायदेशीर आहे.
  • पाण्यात सुमारे 50 फीट पर्यंत हा फीटनेस बॅन्ड Water Resistant आहे.

Redmi Smart Band स्पेसिफिकेशन

  • रेडमीच्या या नव्या फीटनेस बॅन्डला थेट USB charging आहे.
  • एकदा चार्ज केल्यानंतर सलग 14 दिवस त्याची बॅटरी लाईफ असेल असा दावा कंपनी करत आहे.
  • Bluetooth 5.0 कनेक्टिव्हिटी आहे.
  • Android आणि iOS devices सोबत हा फीटनेस बॅन्ड कम्पॅटिबेअल आहे.

Redmi Smart Band हा काळा, निळा, हिरवा आणि ऑरेंज म्हणजेच नारंगी रंगामध्ये उपलब्ध आहे. दरम्यान चीनमध्ये लॉन्च झालेल्या किंमतीपेक्षा हा थोडा महाग आहे. रेडमीच्या Mi Band 3i च्या तुलनेत हा 300 रूपयांनी महाग आहे. त्याची किंमत 1,299 रूपये आहे.