Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

Cyber Scam: तुम्ही अँड्रॉइड मोबाईल किंवा इतर कोणतेही उपकरण वापरत असाल तर सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी तुम्हाला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. दर मिनिटाला 700 हून अधिक सायबर गुन्हे घडत आहेत, त्यापैकी 42 टक्के हल्ले अँड्रॉइड डिव्हाइसवर होतात. सायबर गुन्हेगार असे सॉफ्टवेअर आणि मालवेअर वापरत आहेत जे अँड्रॉइड डिव्हाइस सहजपणे हॅक करू शकतात. अहवालानुसार, 32 टक्के सायबर गुन्हे हे नको असलेल्या अॅप्समुळे घडत आहेत, तर 26 टक्के गुन्हे बनावट जाहिरातींद्वारे (अ‍ॅडवेअर) केले जात आहेत.

DSCI च्या अहवालात धक्कादायक खुलासा -

दरम्यान, डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. DSCI चा हा रिपोर्ट ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. या काळात रॅन्समवेअरशी संबंधित सुमारे 10 लाख प्रकरणे नोंदवली गेली. रॅन्समवेअर हल्ल्यात, गुन्हेगार एखाद्याचा संगणक किंवा डेटा हॅक करतात आणि तो परत करण्याच्या बदल्यात खंडणी मागतात. (हेही वाचा - How to Protect Yourself from Cyber Fraud: सायबर फसवणूक आणि गुन्हेगारांपासून कसे कराल स्वतःचे संरक्षण? जाणून घ्या खास टीप्स)

तथापी, अहवालात असे म्हटले आहे की इंडोनेशियातील एनान ब्लॅक फ्लॅग गँग भारतातील 23 टक्के सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेली आहे. तसेच पाकिस्तानची 'टीम इन्सेन' सायबर टोळी भारतातही सक्रिय आहे, जी सतत सायबर हल्ले करत आहे. अहवालानुसार, 15 टक्के सायबर गुन्हे बांगलादेशातून चालवले जात होते. (हेही वाचा -Cyber Fraud Cases In Pune: पुण्यात एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद; पीडितांना लावला करोडो रुपयांचा चूना)

सायबर गुन्हेगारांकडून सिस्टम हॅक -

प्राप्त माहितीनुसार, सायबर गुन्हेगार डॉक्युमेंट फाइल्स, जावा स्क्रिप्ट, एचटीएमएल, कॉम्प्रेस्ड फाइल्स आणि विंडो शॉर्टकट फाइल्स वापरून सिस्टम हॅक करत आहेत. याशिवाय, गेमिंग, डेटिंग आणि जुगार अॅप्स देखील सायबर गुन्हेगारांसाठी मोठे शस्त्र बनले आहेत. (हेही वाचा -Cyber Fraud in India: भारतामध्ये 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीद्वारे 11,333 कोटी रुपयांचे नुकसान; तब्बल 45% तक्रारी दक्षिणपूर्व आशियाशी संबंधित)

एआय अॅप्स ठरत आहेत सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य -

याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वर आधारित अॅप्स देखील आता सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनले आहेत. अनेक वेळा फोनमध्ये GPT सारखे बनावट चॅट अॅप्स येतात आणि त्यावर क्लिक करून वापरकर्त्याचा महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो. व्हॉट्सअॅप हे सायबर गुन्ह्यांचे एक मोठे माध्यम बनले आहे. अहवालात असे दिसून आले आहे की बहुतेक मालवेअर हेल्थकेअर उद्योगात आढळले आहेत. याशिवाय बँकिंग, हॉस्पिटॅलिटी, शिक्षण, एमएसएमई आणि उत्पादन क्षेत्रे देखील सायबर हल्ल्यांचे बळी ठरत आहेत. तथापी, पुढील काळात सायबर गुन्हेगार त्यांच्या हल्ल्यांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात.

सायबर गुन्हेगारांपासून कसे वाचावे?

वाढत्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अज्ञात अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. कोणत्याही लिंक किंवा अज्ञात वेबसाइटवर क्लिक करण्यापूर्वी काळजी घ्या. नेहमी मजबूत पासवर्ड वापरा. तुमच्या मोबाईल आणि संगणकावर चांगला अँटीव्हायरस इन्स्टॉल करा. तसेच बनावट कॉल, ईमेल आणि व्हॉट्सअॅप संदेशांपासून सावध रहा.