Cyber Crime (फोटो सौजन्य - Pixabay)

Cyber Fraud Cases In Pune: अलीकडे सायबर फसवणुकींच्या घटनांमध्ये (Cyber Fraud Cases) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यात (Pune) बुधवारी एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद करण्यात आली. सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पीडितांना वेगवेगळ्या घटनांमध्ये कोरोडो रुपयांचा चूना लावला. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डेक्कन पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका प्रकरणात एका 52 वर्षीय महिलेची 4,08,499 रुपयांची फसवणूक झाली. स्टॉक ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेला आमिष दाखवले.

56 वर्षीय महिलेची 1.12 कोटी रुपयांची फसवणूक -

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एका 56 वर्षीय महिलेची 1.12 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून भरीव परतावा आणि लोणावळा येथील फार्महाऊस खरेदी करण्याचे आश्वासन देऊन आरोपीने पीडितेला आमिष दाखवले. दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत 26 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. आरोपी दिलीप बोथरा याने पीडितेला स्टील आणि इतर धातूंच्या व्यापारात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. परंतु, शेवटी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी तिचा विश्वासघात केला. (हेही वाचा -Cyber Fraud in India: भारतामध्ये 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सायबर फसवणुकीद्वारे 11,333 कोटी रुपयांचे नुकसान; तब्बल 45% तक्रारी दक्षिणपूर्व आशियाशी संबंधित)

28 वर्षीय महिलेची 23 लाख रुपयांची फसवणूक -

तथापी, विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात, मुंबई क्राइम ब्रँचचा सदस्य असल्याचे दाखवून एका व्यक्तीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्याची धमकी देऊन 28 वर्षीय महिलेची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच आणखी एका दुसऱ्या घटनेत चंदननगर पोलिस ठाण्यात एका 18 वर्षीय तक्रारदाराने काम पूर्ण करण्याच्या बहाण्याने 4,30,300 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली. याच पोलिस ठाण्यातील आणखी एका प्रकरणामध्ये 54 वर्षीय तक्रारदाराला स्टॉक ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचा दावा करून 10,69,149 रुपयांची फसवणूक करण्यात आली. (हेही वाचा -Digital Arrest: मुंबईच्या IT कंपनीतील अधिकाऱ्याची 5 दिवस 'डिजिटल अटक'; 6.3 कोटी लुटले, पुणे पोलिसांनी म्हटले 'सर्वात मोठी सायबर फसवणूक')

62 वर्षीय व्यक्तीची 16,720 रुपयांची फसवणूक -

दरम्यान, आणखी एका घटनेत हडपसर पोलीस ठाण्यात एका 62 वर्षीय व्यक्तीची 16,720 रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद करण्यात आली आहे, पीडितेने सोशल मीडियावर सिंगापूर, हाँगकाँग, चीन किंवा जपानमधून येणाऱ्या प्रवाशांकडून आजारी मांजरीसाठी औषधांची विनंती करत पोस्ट केली होती. सायबर गुन्हेगारांनी मदतीचे नाटक करून पैसे लूटले. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत मुंढवा पोलीस ठाण्यात एका 41 वर्षीय व्यक्तीने आपली 3.98 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. फसवणूक करणाऱ्याने शेअर बाजारातील गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.