Photo Credit- X

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Train)  अपघात नशीबाने टळला. चिपळूण (Chiplun) जवळ असलेल्या कळंबस्ते फाटा (Kalambaste Phata)  येथे फाटक न पडल्याने गोव्याकडून मुंबईकडे रवाना होणारी वंदे भारत एक्स्प्रेस खेर्डी पुलावरच थांबवण्यात आली. नंतर वंदे भारत ट्रेन हळूहळू हॉर्न देत पुढे चालवण्यात आली. चिपळूण रेल्वे स्थानकाच्या आधी कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. फाटकाच्या यंत्रणेमध्ये 15 दिवसाने पुन्हा एकदा बिघाड झाल्याने फाटक न पडल्याने वंदे भारत एक्सप्रेस खेर्डी पुलावरच थांबवावी लागली.

कोकण रेल्वे सोबत घडलेला हा मागील 15 दिकसातील दुसरा प्रकार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या कारभाराविरोधात नागरिक व वाहनचालकांमध्ये संताप आहे. दुसर्‍यांदा मोठा अनर्थ टळला आहे.

कळंबस्ते येथे रेल्वे फाटकाला उड्डाण पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. पंधरागावाकडे जाणाऱ्या लोकांना या उड्डाण पुलावरून प्रवास सुकर होणार आहे. या उड्डाण पुलाची मागणी अनेक वर्षे करण्यात येत आहे. याची कोकण रेल्वेने तरतूद देखील केली आहे. मात्र राज्य शासनाने कडून यासाठी तरतूद करणे गरजेचे आहे. Holi Special Trains on Central Line: मध्य रेल्वे कडून नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे साठी स्पेशल ट्रेन्स जारी; पहा वेळापत्रक .

रेल्वे जात असताना जर फाटक पडले नसेल तर नागरिकांची मोठी तारांबळ उडते. कळंबस्ते फाटकाजवळ फाटक न पडण्याचा प्रकार पुन्हा घडल्याने वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरीहून मुंबईकडे जात असता खेर्डी पुलावर थांबवण्याची वेळ आली.