
जपान (Japan) मध्ये जंगलात सध्या 30 वर्षातील सर्वात भीषण आग लागली आहे. रविवारी (2 मार्च) दिवशी एका छोट्या किनारपट्टीच्या शहराच्या जंगलात जळत होता, ज्यात किमान एकाचा मृत्यू झाला, डझनभर घरांचे नुकसान झाले आणि हजारो रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिले, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.टोकियोच्या ईशान्येला 300 मैल अंतरावर असलेल्या जपानच्या मुख्य बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर ओफनाटो या शहरामध्ये अंदाजे 1,800-हेक्टर (4,500-एकर) आग अनेक दिवसांपासून जळत आहे. शनिवारपासून त्यात 400 हेक्टरने वाढ झाली होती.
जपानच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की त्यांना बुधवारी दुपारी आग लागल्याची माहिती मिळाली आणि बुधवारी रात्रीपर्यंत किमान 84 घरांचे नुकसान झाले. जपानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना गुरुवारी सकाळी या भागाची तपासणी करताना रस्त्यावर एकाचा मृतदेह आढळला. स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली, परंतु इतर कोणतेही तपशील दिले नाहीत.
Japan is battling an unprecedented wildfire in Ofunato City, Iwate Prefecture, with over 1,800 hectares burned. Thousands of residents have been evacuated as the fire continues to spread, marking the worst wildfire disaster since the 1992 Kushiro inferno in Hokkaido. pic.twitter.com/A5HTAcNbaa
— Geopoliti𝕏 (@DalioTroy) March 2, 2025
अग्निशमन यंत्रणेच्या म्हणण्यानुसार सरकारने बुधवारी सुमारे 4,600 रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश जारी केले. रविवारी सकाळपर्यंत सुमारे 1,200 जण शेल्टर मध्ये होते.
आग विझवण्यासाठी बुधवारपासून 14 प्रीफेक्चर्समधील सुमारे 1,700 अग्निशामक दल पाठवण्यात आले आहेत. जपानचे सार्वजनिक प्रसारक NHK कडील व्हिडिओ फुटेजमध्ये, झाडांच्या खोडांमध्ये नारिंगी ज्वाला वर येत होत्या. जंगलावर उगवणाऱ्या धुराच्या ढगांवरून अग्निशामक विमान फिरत असल्याचे दिसून आले आहेत.
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जपानमधील या स्वरूपाची शेवटची आग 1992 मध्ये होक्काइडोच्या उत्तरेकडील बेटावर लागली होती. त्यामध्ये 1,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली, असे अग्निशमन संस्थेच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले, जपान टाइम्सने वृत्त दिले.