सध्या सोशल मीडीयात एक असा मेसेज वायरल होत आहे ज्यामध्ये India Post Payments Bank कडून ज्या ग्राहकांचे पॅन कार्ड तपशील अपडेट नसतील ती अकाऊंट्स ब्लॉक केली जातील असा दावा करण्यात आला आहे. अनेक ग्राहकांनी असा मेसेज मिळाल्याचं म्हटलं आहे. मात्र Press Information Bureau च्या फॅक्ट चेक मध्ये मेसेज मधील दावा खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया पोस्ट ऑफिसकडून असे मेसेज केले जात असल्याचं सांगण्यात आले आहे. कोणाही अनोळखी मेसेज वर, लिंक वर तुमचे वैयक्तिक तपशील न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीआयबी फॅक्ट चेक मधील दावा
Claim: The customer's India Post Payments bank account will be blocked within 24 hours if their Pan card is not updated. #PIBFactCheck:
❌This claim is #Fake
➡️@IndiaPostOffice never sends any such messages
➡️Never share your personal & bank details with anyone pic.twitter.com/rUEI2uHtMG
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)