Instagram Reels (Photo Credits: Twitter)

इंस्टाग्राम (Instagram) आपल्या शॉर्ट व्हिडीओ फीचर 'रील्स'साठी (Reels) स्वतंत्र ॲप लॉन्च करण्याचा विचार करत आहे. द इन्फॉर्मेशनच्या वृत्तानुसार, इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी एका अंतर्गत बैठकीदरम्यान ही माहिती दिली. या नवीन उपक्रमांद्वारे, इंस्टाग्राम वापरकर्त्यांना अधिक चांगले साधने आणि प्लॅटफॉर्म प्रदान करून, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा, अमेरिकेत टिकटॉकवर (TikTok) बंदी घालण्याची चर्चा आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यास, इंस्टाग्राम अधिक वापरकर्ते जोडण्यासाठी या संधीचा फायदा घेऊ शकते. यासाठी नवीन ॲप त्यांना फायद्याचे ठरू शकेल.

यूएस सरकारने आरोप केला आहे की, टिकटॉकची मालकी असलेल्या ByteDance या कंपनीचे दुसऱ्या देशाच्या सरकारशी संबंध आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या डेटाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. मात्र ByteDance ने आरोप फेटाळून लावले आहेत, परंतु अमेरिकेमध्ये टिकटॉकचे भविष्य अजूनही धोक्यात आहे. जानेवारी 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने टिकटॉकवरील बंदीला मंजुरी दिली होती, पण नंतर ती पुढे ढकलण्यात आली.

दुसरीकडे, टिकटॉकने आपली प्रतिमा सुधारण्यासाठी काही बदल केले आहेत, जसे की कंपनीची सुरक्षा टीम बदलणे आणि डेटा सुरक्षा उपाय लागू करणे, परंतु अमेरिकन जनता अजूनही टिकटॉकच्या चिनी मालकीबद्दल चिंतित आहे. 75 दिवसांचे निलंबन एप्रिल 2025 मध्ये संपल्यानंतर, टिकटॉक अमेरिकेमध्ये सुरू ठेवायचे की ते पूर्णपणे बंद केले जाईल यावर अंतिम निर्णय सरकार घेईल. (हेही वाचा: Instagram Teen Accounts in India: मेटा भारतामध्ये लाँच करणार 'इंस्टाग्राम टीन अकाउंट्स' फिचर; पालक ठेऊ शकणार मुलांच्या खात्यावर लक्ष, जाणून घ्या फीचर्स)

दरम्यान, इंस्टाग्राम आणि टिकटॉक हे दोन्ही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, परंतु त्यांचे फीचर्स, युजर्स आणि कंटेंट प्रकार यामध्ये काही महत्त्वपूर्ण फरक आहेत. इंस्टाग्राम हे अजूनही फोटो शेअरिंगवर केंद्रित असून, लांब व्हिडिओ (IGTV), स्टोरीज, आणि रील्ससारख्या विविध फॉर्मॅट्सची सुविधा देते. टिकटॉक केवळ शॉर्ट-फॉर्म व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करते, जेणेकरून वापरकर्ते क्रिएटिव्ह आणि व्हायरल कंटेंट तयार करू शकतात. मात्र अमेरिकेमध्ये इंस्टाग्रामपेक्षा टिकटॉक जास्त लोकप्रिय असल्याचे दिसून येते.