Flipkart | Representational Image | (Photo Credit: Official)

Flipkart Big Saving Days ची सुरुवात येत्या 18 सप्टेंबर पासून होणार आहे. हा सेल 20 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या तीन दिवसांच्या सेलमध्ये ई-कॉमर्स वेबसाईटवर डिस्काउंट आणि शानदार ऑफर्स सुद्धा दिले जाणार आहेत. मोबाईल, टॅबटेल, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू या सेलमध्ये सूटसह खरेदी करता येणार आहेत. तर खासियत म्हणजे ग्राहकांना एखादी वस्तू प्री बुकिंग करायची असल्यास 15-16 सप्टेंबरची तारीख ठरवून देण्यात आलेली आहे. SBI कार्ड युजर्सला EMI आणि कार्डच्या माध्यमातून होण्याऱ्या ट्रान्जेक्शनवर सूट दिली जाणार आहे.(Tecno कंपनीचा Spark Power 2 Air स्मार्टफोन Flipkart च्या माध्यमातून प्रथमच होणार भारतात लाँच, 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता होणार लाईव्ह)

फ्लिपकार्टने आतापर्यंत बिग सेविंग डेज सेल मध्ये उपलब्ध होणाऱ्या वस्तूंसंदर्भात अद्याप खुलासा केलेला नाही. परंतु मोबाईल फोन आणि स्मार्टफोन यांचा उल्लेख असून ते No Cost EMI, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहेत. टीव्ही आणि अप्लायंसे खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना कंपनी नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्ससह पूर्णपणे अप्लायंसेज प्रोडक्ट्स ऑफर करत आहे.

सेलमध्ये 3 कोटींहूनअधिक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स आणि एक्ससरीज विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यावर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स सु्द्धा दिले जाणार आहे. एक्सेसरीज बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये वायरलेस माउस, किबोर्ड, पॉवर बॅक, केबल, हेडफोनवर आकर्षक डिस्काउंट दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त एसबीआय कार्ड युजर्सला एसबीआयच्या क्रेडिट कार्ड आणि एमआय ट्रान्जेक्शनवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जाणार आहे.(Redmi Smart Band भारतामध्ये झालं लॉन्च; किंमत 1,599 रूपये, इथे जाणून घ्या खास फीचर्स)

फ्लिपकार्टने 1 रुपयांत प्रॉक्डक्ट्स प्री-बुक करण्यासह गॅरंटीड स्टॉक मिळणार असल्याची ऑफर सुद्धा दिली आहे. प्री-बुकिंगसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टच्या होमपेजवर प्री-बुक स्टोर येथून आपली ऑर्डर बुक करावी लागणार आहे. परंतु यासाठी 1 रुपया द्यावा लागणार आहे. त्यानंतर 18 सप्टेंबरला ज्यावेळी सेल सुरु होईल तेव्हा उर्वरित रक्कम देऊन प्रोडक्ट खरेदी करता येणार आहे.