Tecno Spark 2 Air (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno भारतामध्ये आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टद्वारे (Flipkart) भारतात लाँच केला जाणार आहे. Tecno Spark Power 2 Air असं या स्मार्टफोनचे नाव असून येत्या 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता हा फ्लिपकार्टवर लाँच केला जाईल. याचे खास लँडिंग पेजही लाईव्ह झाले आहे. Tecno कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर (Twitter) पेजवरुन याबाबत माहिती दिली आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

फ्लिपकार्टवर लाईव करण्यात आलेल्या टीजरवरून Tecno Spark Power 2 Air स्मार्टफोनमध्ये 7 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. तसेच यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप सुद्धा असेल. त्याशिवाय या फोनमध्ये 6000mAh ची जबरदस्त बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- TECNO SPARK Go 2020 Launched in India: केवळ 6 हजार 499 किंमतीत टेक्नो स्पार्क गो 2020 स्मार्टफोन भारतात लॉन्च

या टिजरमध्ये असेही म्हटले आहे की, या फोनला फुल चार्ज केल्यानंतर 4 दिवसांपर्यंत आपल्याला 4 दिवसांचे बॅटरी बॅकअप मिळेल. याच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी वा किंमतीविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून ती तुम्हाला 14 सप्टेंबर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लाईव्ह झाल्यावरच मिळेल. त्यासाठी तुम्हाला 14 सप्टेंबर वाट पाहावी लागेल. कंपनीने ट्विट केलेल्या आणि फ्लिपकार्टवर लाईव्ह केलेल्या पेजवरील माहितीनुसार या स्मार्टफोनची भारतीय बाजारात रियलमी, शाओमी, सॅमसंगशी तगडी टक्कर होईल असं म्हणाला हरकत नाही.

अलीकडेच कंपनीने भारतात Tecno Spark Go 2020 हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची किंमत केवळ 6 हजार 499 रुपये आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आलेला टेक्नो गोचा सक्सेसर आहे, असेही म्हंटले जात आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात 5000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.