कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. परिणामी, अनेक उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी बंद पडल्या आहेत. तसेच भारतीय स्मार्टफोन बाजारात प्रसिद्धी मिळवणारे अनेक कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र, देशात गेल्या काही दिवसांपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनेक स्मार्टफोन कंपन्या पुन्हा एकदा बाजारात आपले नवीन स्मार्टफोन घेऊन येताना दिसत आहेत. यातच टेक्नो कंपनीनेदेखील त्यांचा स्मार्टफोन टेक्नो स्पार्क गो 2020 आज भारतात लॉन्च केला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन रिलीज करण्यात आला आहे.

भारतात टेक्नो स्पार्क गो 2020 स्मार्टफोन केवळ 6 हजार 499 रुपयात खरेदी करता येणार आहे. कंपनीने काही वेळापूर्वी त्यांच्या सोशल अकाऊंटवरून टेक्नो स्पार्क गो 2020 स्मार्टफोनचे फिचर शेअर केले होते. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आलेला टेक्नो गोचा सक्सेसर आहे, असेही म्हंटले जात आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात 5 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- नोकिया प्रेमींसाठी खुशखबर! 5 कॅमेरे असलेला Nokia 5.3 स्मार्टफोन आजपासून Amazon आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध

टेक्नो स्पार्क गो 2020 स्पेसिफिकेशन्स-

टेक्नो स्पार्क गो 2020 मध्ये 6.2 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 32 जीबी स्टोरेज मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, यात ( 12MP + 2MP) चा कॅमेऱ्याचा समावेश देण्यात आला आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आहे. तसेच 5 हजार एमएएचची क्षमता असलेल्या दमदार बॅटरीचा यात समावेश करण्यात आला आहे.

लॉकडाऊन दरम्यान आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागणाऱ्या प्रत्येक स्मार्टफोन कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या स्मार्टफोनच्या किमतीत घट करताना दिसत आहे. कमी किंमतीत अधिक फिचर्स देणारा स्मार्टफोनकडे ग्राहकांची अधिक ओढ असल्याची गेल्या वर्षांमध्ये दिसून आले आहे.