नोकिया प्रेमींसाठी खुशखबर! 5 कॅमेरे असलेला Nokia 5.3 स्मार्टफोन आजपासून Amazon आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध
Nokia 5.3 (Photo Credits: Twitter)

भारतातील मोबाईलच्या बाबतीत लोकप्रिय झालेली कंपनी नोकियाने (Nokia)आपला नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लाँच केला आहे. नोकियाचे भारतीय ग्राहकांचे फार जुने आणि घट्ट असे नाते आहे. नोकियाचे बेसिक फोन्स आजही अनेकांच्या हातात तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र बदलत्या काळानुसार नोकियाने आपल्या फोनमध्ये बदल करत आपला नवा स्मार्टफोन Nokia 5.3 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉन (Amazon) आणि नोकियाच्या अधिकृत साइटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात 5 कॅमेरे (5 Camera) देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाची HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याचे रेश्यो 20:9 इतका आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा नॉच आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 665 चिपसेटसह 4GB/64GB आणि 6GB/64GB अशा दोन वेरियंट उपलब्ध केला आहे. यातील 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 13,999 रुपये असून 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये इतकी आहे. Amazon Halo फिटनेस बॅन्ड लॉन्च, बॉडी फॅट संदर्भातील देणार अचूक माहिती

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा, 5MP चा अल्ट्रावाइड सेंसर आणि 2MP चे दोन अन्य कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यात एक मॅक्रो आणि दुसरा डेप्थ सेंसर आहे. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Nokia 5.3 स्मार्टफोनच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर चालतो. Nokia 5.3 स्मार्टफोन Google Android One प्रोग्रामसह बाजारात आणला आहे.