
भारतातील एसयूव्ही आणि प्रीमियम इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी किआ इंडियाने (Kia India) त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही सेल्टोसचे 2025 चे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. किआ सेल्टोसच्या (2025 Kia Seltos) -या नवीन मॉडेलमध्ये HTE(O), HTK(O) आणि HTK+(O) हे 3 नवीन फीचर-लोड व्हेरियंट समाविष्ट केले आहेत, जे गाडीला आणखी आकर्षक बनवतात. किआ सेल्टोसचे 2025 चे अपडेटेड मॉडेल आता एकूण 24 प्रकारांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये Smartstream 1.5 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर CRDi डिझेल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. या एसयूव्हीच्या एक्स-शोरूम किमती 11.13 लाखांपासून सुरू होतात आणि 20.50 लाखांपर्यंत जातात.
किआ सेल्टोसचे नवीन HTE(O) व्हेरियंट हा एक परवडणारा आणि आकर्षक फीचर्स असलेला पर्याय आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 11.13 रुपये एक्स-शोरूम आहे. या एसयूव्हीमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल्स, LED DRL आणि LED रियर कॉम्बी लॅम्प, प्रकाशित पॉवर विंडो आणि कनेक्टेड टेल लॅम्प आहेत. सेल्टोसचा हा नवीन प्रकार अशा ग्राहकांसाठी आहे, ज्यांना उत्तम फीचर्स असलेली परवडणारी मध्यम आकाराची एसयूव्ही हवी आहे.
किआ सेल्टोसच्या HTK(O) या नवीन प्रकाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे. सेल्टोसचा HTK(O) प्रकार अशा ग्राहकांसाठी योग्य आहे, ज्यांना व्यावहारिकता आणि प्रीमियम लुक हवा आहे. यात पॅनोरामिक सनरूफ, 16-इंच अलॉय व्हील, क्रूझ कंट्रोल, प्रकाशित पॉवर विंडो, रुफ रेल आणि वॉशर आणि डिफॉगरसह मागील वायपर, साउंड सिंकसह मूड लॅम्प आणि स्मार्ट की मोशन सेन्सर यांसारखी प्रगत फीचर्स आहेत.
किआ सेल्टोसच्या HTK+(O) प्रकाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.39 लाख रुपये आहे. ही गाडी अशा ग्राहकांसाठी आहे जे तंत्रज्ञान आणि लक्झरीला महत्त्व देतात. यात 17 इंच अलॉय व्हील, एलईडी हेडलॅम्प आणि टर्न सिग्नल एलईडी सिक्वेन्स लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प, ग्लॉसी ब्लॅक रेडिएटर ग्रिल, ऑटो फोल्ड आऊट रियर व्ह्यू मिरर, स्मार्ट की मोशन सेन्सर यासह इतर महत्त्वाची फीचर्स आहेत. (हेही वाचा: New Honda NX200 Launched in India: होंडाने नवीन इंजिन आणि दमदार फीचर्ससह भारतात लाँच केली नवीन एनएक्एस 200 बाईक; जाणून घ्या किंमत व काय आहे खास)
किआ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रमुख, विक्री आणि विपणन हरदीप सिंग ब्रार यांनी नवीन सेल्टोसच्या लाँचिंगप्रसंगी सांगितले की, किआने भारतात आपला प्रवास सेल्टोसने सुरू केला आणि ते कंपनीसाठी सर्वात महत्त्वाचे मॉडेल राहिले आहे.