2025 Honda NX200 (Photo Credits: Official Website)

New Honda NX200 Launched in India: होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने 13 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन होंडा NX200 भारतात 1.68 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत लाँच केली. ही बाईक पूर्वीच्या CB200X चे पुनर्ब्रँडिंग आहे, ज्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही बाईक विशेषतः अशा रायडर्ससाठी डिझाइन केली आहे ज्यांना रोमांचक प्रवास आणि दैनंदिन गरजांसाठी एक उत्तम पर्याय हवा आहे. बाइकचे डिझाईन स्पोर्टी आणि स्टायलिश आहे, जी शहरी आणि ग्रामीण भागात उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. NX200 तीन रंगांसह एकाच प्रकारात उपलब्ध आहे- अ‍ॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, रेडियंट रेड मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक. NX200 आता भारतातील सर्व HMSI रेड विंग आणि बिग विंग डीलरशिपवर उपलब्ध आहे.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये-

ही बाईक प्रसिद्ध बाईक NX500 पासून प्रेरित आहे. बाईकची रचना मजबूत तसेच आधुनिक देखील आहे. यामध्ये आकर्षक ग्राफिक्स आणि कमांडिंग स्टॅन्सचा आधार आहे. बाईकमध्ये पूर्णपणे नवीन एलईडी हेडलॅम्प, आकर्षक एलईडी टर्नर आणि एक्स-आकाराचे एलईडी टेल लॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल, नेव्हिगेशन, अॅडजस्टेबल विंडशील्ड देण्यात आले आहे. बाईकमध्ये USB C-प्रकारचा चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

इंजिन-

बाईकमध्ये 84.4cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 12.5 किलोवॅटची शक्ती आणि 15.7 एनएमचा कमाल टॉर्क जनरेट करते. इंजिनमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सुरक्षितता लक्षात घेऊन, बाईकमध्ये ड्युअल चॅनेल-एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) देण्यात आली आहे. हे इंजिन विविध भूप्रदेशांमध्ये चांगले पॉवर डिलिव्हरी, इंधन कार्यक्षमता आणि राइडिंग अनुभव सुनिश्चित करते. (हेही वाचा: Yamaha R3, MT-03 Price Cut: यामाहाच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कंपनीने आर3 आणि एमटी-03 च्या किंमती 1.10 लाख रुपयांपर्यंत कमी केल्या, जाणून घ्या नवे दर)

होंडा एनएक्स 200 ची एक्स-शोरूम किंमत 1,68,499 रुपये आहे. ही बाईक एकाच प्रकारात सादर करण्यात आली आहे. या गाडीची बुकिंग होंडाच्या प्रीमियम डीलरशिपवर सुरू झाली आहे. त्याच वेळी, त्याची डिलिव्हरी मार्च 2025 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.