
यंदाचा 97 वा अकादमी पुरस्कार (Academy Awards 2025) सोहळा (ऑस्कर) 2 मार्च 2025 रोजी डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रथमच कॉनन ओ'ब्रायन यांनी केले. भारतातील प्रेक्षकांसाठी, हा सोहळा 3 मार्च 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता स्टार मूव्हीज आणि जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात ‘एमिलिया पेरेझ’ या नेटफ्लिक्स चित्रपटाला सर्वाधिक 13 नामांकने मिळाली होती, तर ‘विकेड’ आणि ‘द ब्रुटालिस्ट’ या चित्रपटांना प्रत्येकी 10 नामांकने मिळाली होती.
संगीत कार्यक्रमांमध्ये ब्लॅकपिंकची लिसा, डोजा कॅट, रे, अरियाना ग्रांडे आणि सिंथिया एरिवो यांनी सादरीकरण केले. विशेषतः, लिसा ही ऑस्कर सोहळ्यात परफॉर्म करणारी पहिली के-पॉप कलाकार ठरली. तसेच, क्वीन लतिफाने क्विन्सी जोन्स यांना श्रद्धांजली अर्पण केली. या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 23 श्रेणींमध्ये ऑस्कर विजेत्यांची घोषणा करण्यात आली.
'द ब्रुटालिस्ट' चित्रपटासाठी अॅड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर आणि 'अनोरा' चित्रपटासाठी मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. या वर्षी, 'अनोरा' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणींमध्ये सर्वाधिक 5 पुरस्कार जिंकले. दुसऱ्या क्रमांकावर, द ब्रुटालिस्ट या चित्रपटाला 3 पुरस्कार मिळाले आहेत. शॉन बेकर दिग्दर्शित, रोमँटिक कॉमेडी 'अनोरा' ही चित्रपट एका श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न करणाऱ्या सेक्स वर्करवर आधारित आहे. या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवात पाम डी'ओर पुरस्कार मिळाला आहे. (हेही वाचा: Mission: Impossible -The Final Reckoning Teaser: 'मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, या दिवशी थिएटरमध्ये होणार दाखल)
2025 च्या 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात खालील विजेते घोषित करण्यात आले-
सर्वोत्कृष्ट चित्रपट: अनोरा
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: शॉन बेकर, अनोरा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: मिकी मॅडिसन, अनोरा
सर्वोत्कृष्ट अभिनेता: अॅड्रियन ब्रॉडी, द ब्रुटालिस्ट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: झो सल्डाना, एमिलिया पेरेझ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: किअरन कल्किन, अ रिअल पेन
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा: शॉन बेकर, अनोरा
सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा: पीटर स्ट्रॉघन, कॉनक्लेव्ह
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: फ्लो
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट: आय'म स्टिल हिअर
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: द ब्रुटालिस्ट
सर्वोत्कृष्ट मूळ संगीत: द ब्रुटालिस्ट
सर्वोत्कृष्ट मूळ गाणे: एमिलिया पेरेझ यांचे एल माल
सर्वोत्कृष्ट ध्वनी: ड्यून: पार्ट टू
सर्वोत्कृष्ट दृश्य प्रभाव: ड्यून: पार्ट टू
सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाईन: विकेड
सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाईन: पॉल टाझवेल, विकेड
सर्वोत्कृष्ट माहितीपट: नो अदर लँड
सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट: द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
सर्वोत्कृष्ट छायांकन: द ब्रुटालिस्ट