AUS Team (Photo Credit - X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 185 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट

प्रथम फलंदाजी करताना भारताची वाईट सुरुवात झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर पुनरागमन करणारा शुभमन गिल 20 धावा करुन बाद झाला. विराट कोहली थोडा वेळ लयीत दिसला पण शेवटी ऑफ स्टॅम्पच्या बाॅलचा बळी ठरला. त्यानंतर पंत आणि जडेजाने संघाची हाती कमान घेतली. त्यांनी थोडा वेळ घेत स्कोरबोर्ड चालू ठेवला. पण मोठ्या शाॅट मारण्याच्या नादात पंत त्याची मोठी विकेट देवुन बसला. त्यानंतर संगळ्यानी विकेट फेकल्या आणि भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट झाला.

बोलंड-स्टार्कची घातक गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना स्कॉट बोलंड आणि मिचेस स्टार्कने कहर केला आहे. स्टार्कने 3 आणि बोलंड 4 विकेट घेतल्या आहे. तर कॅमिन्सला 2 आणि लायनला 1 विकेट मिळाली आहे.