IND vs SL, World Cup 2025, Live Streaming: आज, ३० सप्टेंबर पासून भारतात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. तब्बल ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघ आपले पहिले आयसीसी विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. बारा वर्षांनंतर भारतात या विश्वचषकाचे आयोजन होत असल्याने, भारतीय महिला संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो. सध्या आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे लक्ष्य विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे आहे, तर श्रीलंका संघही मोठ्या मंचावर धक्कादायक कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला भारताचा सामना करताना मोठी कसरत करावी लागेल. या सामन्यांनंतर श्रीलंका संघ आपले उर्वरित ६ सामने घरच्या मैदानावर खेळेल. Team India Players Welcomed: पाकिस्तानला नमवून परतलेल्या टीम इंडियाचे जोरदार स्वागत; तिलक वर्मा, सूर्यकुमार यादवच्या नावाने घोषणाबाजी

सामन्याची माहिती आणि संघ

  • तारीख: ३० सप्टेंबर २०२५
  • दिवस: मंगळवार
  • वेळ: दुपारी ३:०० (भारतीय वेळेनुसार)
  • टॉस: दुपारी २:३०
  • स्थळ: एसीए स्टेडियम, गुवाहाटी (बरसापारा)
  • टीव्हीवर थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
  • ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, उमा छेत्री, रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड.

श्रीलंका संघ: चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विष्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कविषा दिलहारी, निलाक्षी डिसिल्वा, अनुष्का संजीवनी, इमेशा दुलानी, डयूमी विहांगा, पियूमी वत्सला, इनोका रणवीरा, सुगंदिका कुमारी, उदेशिका प्रबोधनी, मल्की मडारा, अचिनी कुलसूर्या.