Kanya Pujan 2025 Messages: आज, ३० सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्राची महाअष्टमी साजरी होत आहे. या दिवसाला दुर्गा अष्टमी असेही म्हणतात आणि या दिवशी दुर्गेचे आठवे रूप असलेल्या देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी गौरीची पूजा केल्याने जीवनात सुख-शांती येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाअष्टमीला नवरात्रातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक मानले जाते. महाअष्टमीला अनेक घरांमध्ये कन्या पूजा आणि कुमारी पूजा करून नवरात्राची सांगता केली जाते. या दिवशी कन्या पूजन केल्याने इच्छित फळ मिळते आणि जीवनात आनंद व समृद्धी येते, असे मानले जाते. या दिवशी संध्याकाळी संधी पूजा करण्याचीही परंपरा आहे, जी अष्टमी आणि नवमीच्या संधीकाळात केली जाते.

दरम्यान, कन्या पूजननिमित्त आपल्या मित्र-परिवारास Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे या मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा नक्की द्या. कन्या पूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या

कन्या पूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

कन्या पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कन्या पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

कन्या पूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

महाअष्टमीला कन्या पूजन कसे करावे?

  • निमंत्रण: कन्या पूजनासाठी कमीत कमी ९ मुली आणि १ लहान मुलाला आदराने एक-दोन दिवस आधी घरी आमंत्रित करा.
  • स्वागत: मुली घरी आल्यावर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा. त्यांच्या कपाळावर टिळक लावा आणि त्यांना आरामात बसवा. शक्य असल्यास, त्यांच्या गळ्यात स्कार्फ घालून त्यांचा सन्मान करा.
  • भोजन: त्यांच्या आवडीचे शुद्ध आणि स्वादिष्ट भोजन तयार करून त्यांना प्रेमाने वाढा.
  • भेटवस्तू आणि आशीर्वाद: भोजन झाल्यानंतर, आपल्या क्षमतेनुसार त्यांना भेटवस्तू द्या. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करा.

या पद्धतीने कन्या पूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.