रशिया युक्रेन संघर्ष (Russia-Ukraine War) आता जगाच्या चिंतेचा विषय झाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी जग प्रार्थना करत असतानाच एक धक्कादायक बातमी आली आहे. रशियाने युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्प (Nuclear Power Plant) असलेल्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. त्यातून युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पांना आगी लागत आहेत. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियाला अणुउर्जा प्रकल्पांवर केले जाणारे हल्ले थांबविण्यात यावेत. तसेच, रशियाने युक्रेनच्या भूमीवरील सैन्य मागे घ्यावे. अणुउर्जा प्रकल्पांना आग लागल्याच त्याचा जगाला फटका बसू शकतो, असे युक्रेनने म्हटले आहे.
- रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये अक्षरश: हैदोस घालायला सुरुवात केली आहे. खारकीव येथे रशियाने मोठ्या प्रमाणे कब्जा मिळवला आहे. तिथल्या सार्वजनिक इमारती आणि खासगी इमारतींनाही मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचला आहे. अनेक इमारतींना हानी पोहोचली आहे.
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमेनुअल मैकरॉन (Emmanuel Macron) यांनी म्हटले आहे की, रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्षाचा पुढचा टप्पा अधिक विनाशकारी असेल. एमेनुअल मैकरॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत सुमारे 90 मिनीटे चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनमध्ये आता सर्वात वाईट काळ येऊ घातला आहे. रशियाचा संपूर्ण युक्रेनवर कब्जा मिळविण्याचा विचार असल्याचा दावा एमेनुअल यांनी केला आहे. (हेही वाचा, Russia-Ukraine War: युक्रेनमधील कीव येथे एका भारतीय विद्यार्थ्यी गोळीबारात जखमी, वीके सिंह यांची माहिती)
- युक्रेनमधील कीव (Kyiv) येथे झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) राज्य मंत्री (MoS) जनरल वीके सिंह (VK Singh) यांनी दिली आहे. त्यांनी पोलंडच्या रेजजो विमानतळावर ही माहिती दिली.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावले आहेत. या हल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर निशेधही केला जातो आहे. परिणामी रशियातील फेसबुक आणि विविध मीडिया वेबसाईट शुक्रवारी काही काळासाठी ठप्प झाल्या. फेसबुकशिवाय मेडुजा, ड्यूश वेले, आरएफई-आरएल आणि बीबीसी यांसारख्या रशियन भाषेत असलेल्या विविध प्रसारमाध्यमांच्या वेबसाईट्स काही काळ काम करत नव्हत्या. विविध इंटरनेट साईट्सवर नजर ठेवणारी एनजीओ ग्लोबलचेकनेही याची पुष्टी केली आहे.