Diwali Festival 2025 Dates

Diwali Festival 2025 Dates: दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात. हा सण भारतातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे. जो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. जवळपास सलग पाच दिवस चालणारा हा सण देश आणि जगभरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अर्थात भारतात विविधतेत एकता असल्याने हा सण साजरा करण्याचे दिवस कधी कधी मागेपुढे होतात. त्यामुळे सणाचा मुख्य दिवस कोणता याबाबत मतमतांतरे असतात. महाराष्ट्रात हा सण पहिला दिवा, पहिली आंघोळ, भाऊबीज, दुसरी आंघोळ, या संकल्पनेने ओळखला जातो. ज्याला वसुबारस, धनत्रोयदशी, लक्ष्मीपूजन, नरकचतुर्दशी असेही संबोधले जाते. यंदा दिवाळी २०२५ शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. जाणून घ्या. उत्सवाच्या तारखा.

जाणून घ्या दिवाळीच्या महत्वाच्या तारखा

यंदाची दिवाळी पाच दिवस साजरी केली जाईल. प्रत्येक समूह, भाषा, भौगोलिक प्रदेशांनुसार चालिरीती वेगवेगळ्या असल्याने तारखांमध्ये तफावत आढळते. महाराष्ट्रात महालक्ष्मी दिनदर्शिका आणि पंचांगानुसार या वर्षीच्या उत्सवांच्या प्रमुख तारखा खाली दिल्या आहेत

दिवस उत्सव मराठी संकल्पना (महाराष्ट्रात) तारीख
धनत्रयोदशी वसुबारस (धेनु पूजा) १८ ऑक्टोबर (शनिवार)
नरक चतुर्दशी पहिली आंघोळ / छोटी दिवाळी २० ऑक्टोबर (सोमवार)
लक्ष्मीपूजन दिवाळीचा मुख्य दिवस २१ ऑक्टोबर (मंगळवार)
दीपावली पाडवा बलीप्रतिपदा (दुसरी आंघोळ) २२ ऑक्टोबर (बुधवार)
भाऊबीज भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण २३ ऑक्टोबर (गुरुवार)

पाच दिवसांच्या दिवाळीचे महत्त्व:

धनत्रयोदशी (१८ ऑक्टोबर):

हा दिवाळीचा पहिला दिवस असून, तो संपत्तीची देवता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना समर्पित असतो. या दिवशी समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करण्यासाठी सोने, चांदीसारखे मौल्यवान धातू खरेदी करण्याची प्रथा आहे.

नरक चतुर्दशी (२० ऑक्टोबर):

या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. भगवान कृष्णाने नरकासुर राक्षसावर विजय मिळवल्याचा हा दिवस आहे. घरातील नकारात्मकता दूर करून प्रकाश आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्यासाठी विधी केले जातात.

लक्ष्मीपूजन (२१ ऑक्टोबर):

दिवाळीचा मुख्य दिवस. रावणाचा पराभव करून भगवान रामाचे अयोध्येत पुनरागमन झाले म्हणून हा दिवस साजरा करतात. घरे दिव्यांनी (मातीचे दिवे), रांगोळीने आणि रोषणाईने सुशोभित केली जातात. संध्याकाळी, कुटुंबे संपत्ती आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतात.

दीपावली पाडवा आणि बलीप्रतिपदा (२२ ऑक्टोबर):

बळी प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस, गावकऱ्यांचे मुसळधार पावसापासून संरक्षण करण्यासाठी भगवान कृष्णाने गोवर्धन टेकडी उचलण्याच्या कृतीला समर्पित आहे. या दिवशी गोवर्धन टेकडीची पूजा करतात आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून अन्न अर्पण करतात.

भाऊबीज (२३ ऑक्टोबर):

दिवाळीचा शेवटचा दिवस, भाईबीज (Bhai Dooj), भाऊ-बहिणींमधील प्रेमळ बंध साजरा करतो. बहिणी आपल्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात.

वाचकांसठी सूचना: प्रस्तुत तारखा महालक्ष्मी पंचांग आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित आहेत. वाचकांनी कोणत्याही प्रथा, परंपरेचे पालन करण्यापूर्वी स्थानिक रितीरिवाज, पंचांग आणि तारखांची खात्री करून घ्यावी.