Mi TV Horizon Edition चे दोन स्मार्ट टीव्ही भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Horizon Edition (Photo Credits-Twitter)

शाओमी (Xiaomi) कंपनीचे Mi TV Horizon Edition मधील Mi TV 4A भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही दोन साइजच्या वेरियंट्समध्ये म्हणजेच 32 इंच आणि 43 इंच मध्ये येणार आहे. 32 इंचाच टीव्हीची किंमत 13,499 रुपये आहे. याची विक्री भारतात 11 सप्टेंबर पासून दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर होणार आहे. तर 43 इंचाच्या टीव्हीसाठी 22,999 रुपये मोजावे लागणार आहेत. या स्मार्ट टीव्हीसाठी 15 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून अॅमेझॉनवर सेल सुरु होणार आहे. त्याचसोबत हे दोन्ही स्मार्ट टीव्ही Mi.com, Mi Home येथून सुद्धा खरेदी करता येणार आहेत.

Mi TV 4A च्या 32 इंचाच्या आणि 43 इंचाच्या स्मार्ट टीव्हीसाठी बेजेललेस डिझाइन आणि LED डिस्प्ले दिला आहे. तसेच फुल एचडी प्लस रेजोल्यूशन मिळणार असून जो शाओमीच्या अॅन्ड्रॉइड TV9 बेस्ट PatchWall प्लॅटफॉर्मला सपोर्ट करणार आहे. Mi TV Horizon Edition मध्ये Cortex-A53 प्रोसेसर सुद्धा दिला आहे. जो 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेजसह येणार आहे. Mi TV Horizon Edition स्मार्ट टीव्हीच्या दोन्ही मॉडेलमध्ये 20 हून अधिक एन्टरटेंन्मेंट अॅपचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या व्यतिरिक्त टीव्हीत शानदार Horizon डिस्प्ले दिला आहे. तसेच Vivid पिक्टर इंजिन आणि 20W स्टीरिओ स्पीकर आणि Mi Quick Wake चे सपोर्ट मिळणार आहे. Mi Horizon Edition सीरिजचे स्मार्ट टीव्ही अॅन्ड्रॉइड TV 9.0 वर काम करणार आहे.(Oppo Enco W51 वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच, संगीताचा जबरदस्त अनुभव देणा-या या गॅजेटची वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)

हा टीव्ही Google Data Server फिचरसह येणार आहे. म्हणजेच ग्राहकाला कंन्टेंट पाहताना तीनपट अधिक कंन्टेंट पाहता येणार आहे. त्याचसोबत नव्या स्मार्ट टीव्हीच्या सीरिज Mi QuickWake सपोर्ट मिळणार आहे. जो तुमच्या टीव्हीला पुन्हा 5 सेकंदात सुरु करणार आहे. या व्यतिरिक्त 20W स्टिरिओ स्पीकरसह DTS-HD आणि 3.5mm ऑडिओ आउटपुट, SPDIF आणि 3 HDMI पोर्ट दिले जाणार आहेत.