Raj Thackeray Bhaiyyaji Joshi | X @ANI

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या विधानाचे यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही अशा आशयाचं विधान केल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. भय्याजी जोशी यांच्या विधानाचे राज्याच्या विधानसभेत पडसाद उमटले. संजय राऊतांनी राजद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी केली आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली सविस्तर प्रतिक्रिया X च्या माध्यमातून शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी जोशींना सुनावताना 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं' असं म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरूवात होताना दिसत आहेत. हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं. हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं? असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

पहा राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

भय्याजी जोशी यांचं स्पष्टीकरण

मराठी ही महाराष्ट्राची भाषा नाही असे माझे म्हणणं नाही. माझे विधान चुकीचे पद्धतीने मांडण्यात आले. प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी ओळख असते.