स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो (Oppo) ने आपले नवे ईअरफोन्स Oppo Enco W51 भारतात लाँच केले आहे. या ईअरफोन्स आकर्षक डिझाईन्स पाहता क्षणीच कोणालाही आवडेल असेच आहे. या ईयरफोन्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात एक्टिव्ह नॉईस कॅन्सलेशन आणि वायरलेस चार्जिंगसह (Wireless Charging) 4999 रुपयाच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ओप्पो कंपनी गेल्या कित्येक दिवसांपासून भारतात आपले अन्य गॅजेट्सचे प्रस्त वाढविताना दिसत आहे. हा ईयरफोन Oppo F17 सीरिजसह लाँच करण्यात आला आहे. हे ईअरफोन्स लवकरच विक्रीसाठी उपलब्ध केले जातील.
ईयरफोन्स दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. यात पांढरा आणि निळा असे दोन रंगांचे पर्याय देण्यात आले आहे. याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, यात देण्यात आलेल्या अॅक्टिव नॉईस कॅन्सलेशन फीचरसह कंपनीने असे सांगितले आहे की, याचा आवाज 35dB पर्यंत कमी करता येतो. हे ईयरफोन्स 3 मायक्रोफोन्ससह येतात. ओप्पोचे लेटेस्ट ईयरबड्स Qi वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतात. Oppo A53 2020 Launched in India: ओप्पो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो ए53 2020 भारतात लॉन्च; काय आहे खासियत? घ्या जाणून
Oppo Enco W51 ला कोणत्याही चार्जिंग मॅट आणि पॅड्ससोबत चार्ज केले जाऊ शकते. यात USB टाइप-सी पोर्ट द्वारे देखील चार्ज केले जाऊ शकते. या ईयरफोन्समध्ये 7mm डायनॅमिक ड्रायवर दिला गेला आहे. त्यासोबतच कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.0 दिला गेला आहे. यात 25mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्यासोबतच याच्या चार्जिंग केसमध्ये 480mAh ची बॅटरी आहे. यात 3.5 तासांचा बॅटरी बॅकअप असण्याचा कंपनीचा दावा आहे. तर चार्जिंग केसमध्ये 20 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप आहे.
अलीकडेच ओप्पो कंपनीने आपला धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो ए53 2020 (Oppo A53 2020) बाजारात उतरवला आहे. ओप्पोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची रिअलमी 6, सॅमसंग गॅलेक्सी M31 आणि रेडमी नोट 9 प्रो यांसारख्या स्मार्टफोनसोबत टक्कर असणार आहे.