Oppo A53 2020 (Photo Credit: Oppo )

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. ज्यामुळे बऱ्याच स्मार्टफोन कंपन्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावा लागले आहे. मात्र, भारतात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारात नवनवीन स्मार्टफोन दाखल होऊ लागले आहेत. यातच ओप्पो कंपनीने आपला धमाकेदार स्मार्टफोन ओप्पो ए53 2020 (Oppo A53 2020) बाजारात उतरवला आहे. ओप्पोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची रिअलमी 6, सॅमसंग गॅलेक्सी M31 आणि रेडमी नोट 9 प्रो यांसारख्या स्मार्टफोनसोबत टक्कर असणार आहे.

ओप्पोच्या या ए सीरिजमधला स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यावर मोठी पसंती मिळणार, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. ओप्पो ए 53 2020 स्मार्टफोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम अशा 2 व्हेरिअंटमध्ये खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 490 रुपये आहे. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक, फेअरी व्हाइट आणि फॅन्सी ब्लू अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे देखील वाचा- भारतीयांमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारसरणीत बदल, 'या' गोष्टी पाहून Buy केला जातोय नवा मोबाईल

ओप्पो ट्वीट-

ओप्पो ए 53 2020, अँड्रॉइड 10 वर आधारित कलर ओएस 7.2 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5-इंच एचडी+ (1,600×720 पिक्सल) डिस्प्ले (90 Hz रिफ्रेश रेट) आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (16MP + 2MP + 2MP) आहे. याशिवाय सेल्फीसाठी पुढील बाजूला एक 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा होल-पंच अटआउटच्या आतमध्ये सेट करण्यात आला आहे. ओप्पो ए 53 मध्ये 64 जीबी/ 128 जीबी स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.